Ad will apear here
Next
बॉब विलीस
आपल्या वेगवान गोलंदाजीने एक काळ गाजवलेले इंग्लंडचे क्रिकेटपटू रॉबर्ट जॉर्ज डिलन उर्फ बॉब विलीस यांचे चार डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.............
बॉब विलीस यांचा जन्म सुंदरलँड, काउंटी डरहॅम येथे ३० मे १९४९ रोजी झाला. कोल्हामजवळील स्टोके डी लशीबरोन या सरे प्रांतातील गावात छोटा बॉब मोठा झाला. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तेथेच राहिला. त्याचे वडील बीबीसीचे कर्मचारी होते. त्याला डेव्हिस नावाचा एक मोठा भाऊ होता, त्याच्याबरोबर तो बागेत क्रिकेट खेळला.

त्यांच्या नावातील डिलन हे नाव विख्यात गायक बॉब डिलन यांच्या प्रेमापोटी विलीस यांनी स्वत:च समाविष्ट केले होते. ते दिसायचेही त्या काळातील पाश्चायत्य रॉक गायकासारखेच. साडेसहा फूट उंची, मानेपर्यंत रुळणारे भुरकट केस आणि निळे डोळे, लांब नि काहीसे शरीरापासून लोंबकळणारे हात. खरे तर तेज गोलंदाजासाठी ही काहीशी प्रतिकूल शरीरकाठीच.

ऑस्ट्रेलियन, वेस्ट इंडियन आणि काही प्रमाणात पाकिस्तानी तेज गोलंदाजांची क्रिकेटविश्वाजत दहशत असण्याच्या काळात म्हणजे १९७०-८०च्या संक्रमण काळात इंग्लंडच्या ज्या दोन गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला, ते होते सर इयन बोथम आणि बॉब विलीस. त्यापैकी बोथम हे अष्टपैलू म्हणजे विध्वंसक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. याउलट विलीस केवळ गोलंदाज होते; पण बोथम यांच्यापेक्षा खूपच अधिक वेगवान.

बॉब विलीस अत्यंत वेगवान गोलंदाज म्हणून नावाजले. ९० कसोटी सामन्यांत त्यांनी ३२५ बळी घेतले. १९७०-७१च्या अॅशेस मालिकेसाठी तेव्हा २१ वर्षांच्या असलेल्या विलीस यांना पाचारण केले गेले. कारण इंग्लंडचा एक प्रमुख गोलंदाज जायबंदी झाला होता. अपघाताने मिळालेल्या या संधीचे विलीस यांनी सोने केले. इंग्लंडसाठी सातत्याने गोलंदाजी करण्याचा ताण त्यांच्या शरीराला लवकरच जाणवू लागला होता.

बॉब विलीस यांनी इंग्लंडचे नेतृत्वही केले. त्यात त्यांना संमिश्र यश मिळाले. परंतु निवृत्तीनंतर त्यांनी केलेले समालोचन त्यांच्या गोलंदाजीइतकेच धारदार ठरले. अत्यंत तिखट निरीक्षणांना किंचित विनोदाची झालर लावलेली त्यांची भाष्ये त्या काळच्या इंग्लिश क्रिकेटपटूंनाच सर्वाधिक झोंबत. त्या काळातील विशेषत: ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाजांप्रमाणे विलीस यांनी कधीच शिवीगाळ वगैरे केली नाही. परंतु हेडिंग्लेमधील त्या थरारक विजयानंतर ‘बीबीसी’समोर विलीस यांनी काढलेले उद्गार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवण्यास पुरेसे आहेत.

रॉबर्ट जॉर्ज डिलन अर्थात बॉब विलीस यांनी चार डिसेंबर २०१९ रोजी या जगाचा निरोप घेतला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKWCH
Similar Posts
... तर माही नावाचे ‘शांत तुफान’ फुटबॉलपटू झाले असते! महेंद्रसिंह धोनी हे एक ‘शांत तुफान’... विश्वचषक स्पर्धेतली शेवटची खेळी खेळला आणि मला अचानक आठवला आमचा माही. होय! मी माहीबरोबर माझ्या पाचवी ते सातवी इयत्तेत फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळलो आहे. त्याला माझी आठवण असणे कठीण आहे. कारण सातवीनंतर आमचा काही संपर्क नाही. आम्ही दोघेही रांची येथे मेकॉन लिमिटेड
भारताचा ‘स्वयंघोषित सम्राट’ ब्रिटनचे राजे पाचवे जॉर्ज यांच्या निधनाला आज (२० जानेवारी) ८५ वर्षे झाली. त्याने स्वत:ची ‘भारताचा सम्राट’ अशी द्वाही फिरवून घेतली खरी; पण त्याला स्वत:च्या देशातही सुखाने राज्य करता आले नाही.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना ५० वर्षे पूर्ण पाच जानेवारी १९७१ रोजी क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू होण्यासाठी पाऊस कारणीभूत ठरला होता. आज त्या पहिल्या सामन्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना ४९ वर्षे पूर्ण पाच जानेवारी १९७१ रोजी क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नच्या मैदानावर खेळवण्यात आला. एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू होण्यासाठी पाऊस कारणीभूत ठरला होता. त्याविषयीची ही माहिती....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language